दिनांक 26 जानेवारी या दिवशी या कार्यक्रमाचा भजन कीर्तनाच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली 27 जानेवारी या दिवशी मंडळातर्फे रात्री आठ वाजता विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
गावकऱ्यांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घेतला.
यावेळी या कार्यक्रमात उत्कृष्ट रेकॉर्डिंग डान्स वक्तृत्व यावर मंडळातर्फे बक्षीस वितरण करण्यात आले. दिनांक 28 जानेवारीला मंडळातर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. सदर कार्यक्रमात ग्रामस्थांनी 90 टक्के सहभाग दर्शविला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे मार्गदर्शक माननीय सुरेश पाटील आहिरकर तसेच वसंत पाटील गुंडावार यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले.
त्याचप्रमाणे तीन दिवसीय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी या तिरुपती देवस्थानचे नवनिर्मित अध्यक्ष मनोज भाऊ अहिरकर, उपाध्यक्ष प्रकाश गुंडावार, सचिव प्रशांत माकोडे,कोषाध्यक्ष प्रवीण नारलावार, सहसचिव नरेंद्र नारलावार,तसेच इतर संचालक मंडळातील सदस्य आणि सहकार्याने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.भविष्यात अशाच प्रकारे कार्यक्रम होत राहावे अशी अपेक्षा माननीय सुरेश पाटील अहिरकर यांनी व्यक्त केली.
0 Comments