नांदगाव ग्रामपंचायत च्या वतीने चौका चौकात नारळाचे वृक्षारोपण
मुल तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत च्या वतीने गावातील चौका चौकात नारळाचे वृक्ष लावण्यात आले सदर प्रसंगी वृक्षारोपण करताना सरपंच हिमानीताई वाकुडकर यावेळी उपस्थित होत्या.नांदगाव चे माजी उपसरपंच विजय जाधव, तसेच माजी उपसरपंच जोगेश्वर मोरे, सारंग भंडारे, बंडूजी चलाख,किसनजी अलीवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
गावातील चौका चौकात नारळाची झाडे लावण्यात येत असल्याने ग्रामपंचायतच्या अभिनव उपक्रमाबद्दल नागरिकांनी प्रशंशा केलेली आहे.असेच चांगले कार्यक्रम होत राहावे अशी अपेक्षा सुद्धा केलेली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा