गडचिरोली /प्रतिनिधी दि. 25/10/2022:-
दिवाळीचा आनंदाचा व मांगल्याचा सण प्रत्येकजण आपल्या कुटुंबासोबत मोठ्या आनंदाने प्रेमाने साजरा करीत असतो.मागील दोन वर्षाच्या कालावधीत कोरोना महामारीमुळे लोकांना दिवाळी साजरी करता आली नाही. त्यामुळे यावर्षी लोकांमध्ये उत्साह आहे, ते आपल्या आर्थिक कुवतीप्रमाणे दीपावली आपल्या मुलाबाळासह साजरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. या दीपावलीचा आनंद सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच महिला व बाल विकास विभागाच्या कार्यरत संस्थांमधील अनाथ,निराधार, व निराश्रीत महिला व बालकांना सुद्धा घेता यावा याकरिता लायन्स क्लब गडचिरोली यांच्या वतीने दिनांक 22/10/2022 ला लोकमंगल अहिल्यादेवी बालसदन घोट येथे मा. जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने एक दिवसीय दीपावली सण साजरा करुन महिला व बालकांना नवे कपडे व फराळ देण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन मा. मंत्री महोदय महिला व बाल विकास विभाग यांच्या निर्देशानुसार जिल्हा महिला बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनाखाली लायन्स क्लब गडचिरोलीच्या वतीने व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. संस्थेतील १५ बालकांना आणि स्वधार गृह घोट येथील ७ महिलांना असे एकूण २२ जणांना दिवाळी निमित्त नवीन कपडे, साड्या व फराळ साहित्य वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमात लायन्स क्लब गडचिरोलीचे पदाधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास विभागातील जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती आणि लोकमंगल संस्थेतील सदस्य व कर्मचारी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी होऊन बालगृहातील मुले व स्वाधार गृहातील महिलांची दिवाळी आनंददायी केली.
या उपक्रमाकरीता लॉ. ज्योती देवकुले, लॉ. रहीम दोडीया व लॉ. प्रफुल्ल सारडा यांचे विशेष सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रमाला लायन्स क्लबच्या अध्यक्षा लॉ. डॉ. सविता सादमवार, उपाध्यक्ष लॉ. सतीश पवार, कोषाध्यक्ष ममता कुकडपवार, ज्येष्ठ सदस्य लॉ बाळासाहेब पद्मावार, लॉ प्रभू साधमवार, लॉ. माणिक ढोले, लॉ. सुचिता कामडी, लॉ. परवीन भामानी, लॉ. गुलाब मडावी व लॉ भारती मडावी, लॉ. प्रणाली वरखडे, आशा करोडकर उपस्थित होते. त्याचप्रमाणे बाल कल्याण समितीचे अध्यक्ष वर्षा मनवर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, सदस्य दिनेश बोरकुटे, बालसदन घोटच्या अधिक्षिका सिस्टर निर्मला, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कर्मचारी कवेश्वर लेणगुरे, प्रियंका आसुटकर, जयंत जथाडे, उज्वला नाखाडे, पूजा धमाले, रवींद्र बंडावार, निलेश देशमुख, उपस्थित होते.
0 Comments