Ticker

6/recent/ticker-posts

दोन दुचाकी ची समोरासमोर धडक, दोघेही गंभीर




चंद्रपूर आदीलाबाद महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरपना तालुका हद्दीत येणाऱ्या वनसडी लगत लोणी गावाच्या फाट्यावर दिनांक २५/१०/२०२२ मंगळवार च्या रात्रौ सुमारे ८.०० वाजताच्या दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटर सायकलच्या एका बाजूला भरधाव वेगात जोरदार घडक झाली. एका मोटर सायकल मालकांचे नाव दिपक खरवडे (वय ४०) लोणी गावचा रहिवासी असून दर वेळी सारखा लोणी गावाच्या रस्त्याच्या उजव्या बाजूच्या वाटेने वळू लागताच विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या मोटर सायकलने जोरदार धडक मारली.  दुसऱ्या मोटर सायकल चालकांची अद्याप मूळ गावाचे नावे माहिती मिळाली नाही.

 आणि दोन्ही मोटारसायकल मालकांना दुखापत व गंभीर जखमी झाले. घटनास्थळी हजर असणाऱ्या लोकांनी कोरपना सरकारी रुग्णालयात मध्ये फोन करून रुग्णवाहिकाला बोलावून दोघांना
गंभीर अवस्थेत चंद्रपूर सरकारी रुग्णालया मध्ये उपचारासाठी नेण्यात आले व कोरपना तालुक्यातील हद्दीत येणाऱ्या पोलीस स्टेशन मध्ये दोन्ही मोटर सायकला चार चाकी गाडी मध्ये टाकून नेण्यात आल्या. व दोन्ही मालकांचे मोटरसायकल पोलीस स्टेशन ला जमा करण्यात आले. एका मोटर सायकल मालकांची नावे अद्याप स्पष्ट झाले नाही. यांच्या नावाचा तपास कोरपना पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments