◼️◽एकाच महिन्यातील दुसरी घटना ! रात्रीची पोलिस गस्त वाढविणे अतिशय महत्वाचे !
चिमूर - नेरी (चंद्रपूर)
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेश्या नसल्याने अनेकांना दळणवळणासाठी अडचणीचा सामना करावा लागतो .त्यामुळे त्रस्त झालेले लोक कर्ज काढून दुचाकी घेतात. विविध कामासाठी फिरताना दुचाकी रस्त्यालगत उभी करून आपल्या कामासाठी जातात पण आपण ठेवलेली दुचाकी ही सुरक्षित राहील की नाही याची फारशी काळजी घेत नसेल तर सावधान ! कारण ठेवलेले वाहने नेरी परिसरात दिवसा ढवळ्या चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. या परिसरातुन चोरीला जाणारी वाहने ही लवकर मिळत नाही.
त्यामुळे आपल्या वाहनाची काळजी आपण घेण्याची आता गरज निर्माण झाली आहे . उभी केलेली वाहने दिवसा ढवळ्या चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अश्याच प्रकारची एक घटना दि. २५ ऑक्टोंबला दुपारी दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली . धनराज गोमाजी सोयाम यांनी आपली स्प्लेंडर प्लस क्रमांक एम एच 40 सीबी 2104 ही जगन्नाथ कॉम्पुटर नेरी येथे उभी करुन ठेवली व ते आपले काम करण्याकरिता गेले. काम आटोपुन परत येतात त्यांना त्याची गाडी त्या ठिकाणी दिसली नाही. इतरत्र त्यांनी शोधाशोध केली परंतु काही उपयोग झाला नाही, अखेर त्यांनी घटनेची माहिती नेरी पोलीस चौकीचे मेजर धानोरे यांना दिली. धानोरे यांनी कुठलाही वेळ न घालवता घटनास्थळी येऊन परिसरात असलेली सर्व सीसीटीव्ही फुटेज संकलीत केले व पुढील तपास सुरू केला. चोरीच्या घटनेची माहिती नेरी व आजूबाजूच्या गावात पसरली. बारा तासाच्या आतच चोरीला गेलेली दुचाकी मिळवून देण्यात पोलिसांनी यश मिळविले. चोरट्याने चोरी केलेली दुचाकी बाजार चौकातील ओठ्याजवळ आणून ठेवली व तो फरार झाला . सदरहु दुचाकी ही पहाटेला मिळाली. पोलिस विभागांने वेळीच दखल घेतल्यामुळे ती मिळाली.या पूर्वी चोरीला गेलेल्या दुचाकीचा अद्याप शोध लागला नाही.नेरीत रात्रीची पोलिस गस्त वाढविणे अतिशय महत्वाचे व तितकेच आवश्यक झाले आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading