सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा : तीन दशकांच्या समर्पित सेवेला मानाचा मुजरा
चंद्रपूर नगरी | पोंभूर्णा प्रतिनिधी
पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील राष्ट्रमाता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. दिलीप भारोतराव मॅकलवार यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त तसेच त्यांच्या तीन दशकांच्या समर्पित शैक्षणिक, सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव करण्यासाठी रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.१५ वाजता सुमन मंगल कार्यालय, पोंभूर्णा येथे भव्य सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सुमारे तीन दशकांच्या सेवाकाळात श्री. दिलीप मॅकलवार यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपत उल्लेखनीय कार्य केले आहे. शिक्षण क्षेत्रासोबतच विविध सामाजिक, शैक्षणिक व सार्वजनिक संस्थांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळत समाजहितासाठी सातत्याने योगदान दिले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. एस. एस. टिकले (सचिव, राष्ट्रमाता ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ, देवाडा खुर्द) राहणार आहेत.
यावेळी शिक्षण, सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून त्यामध्ये श्री. गोपी गणेश, श्री. देवराव भोंगे, श्री. अजय वानखेडे, श्री. पुरुषोत्तम कोवासे, श्रीमती हर्षिताश्री शर्मा, सौ. सुलभाताई पिपरे, श्री. अशोक भास्कर, श्री. विलास राऊत, श्री. संजय रामटेके, श्री. भगवान आवारी, श्री. अजय मेश्राम, श्री. राजेश व्यास, श्री. हरिष वानखेडे, श्री. पी. एस. राजगोरे तसेच श्री. राजू कुंभरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून सौ. सुनीता दिलीप मॅकलवार, श्री. इंजि. गणेश सुरेशराव करेवाड, सौ. डॉ. कल्याणी गणेश करेवाड, कु. आसावरी दिलीप मॅकलवार, कु. गर्गी गणेशराव करेवाड तसेच समस्त मॅकलवार परिवार व मित्रपरिवार यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री. दिलीप मॅकलवार यांच्या कार्याला कृतज्ञतेची मानवंदना अर्पण करण्याचे आवाहन केले आहे.
श्री. दिलीप मॅकलवार यांचा परिचय
- प्राचार्य, राष्ट्रमाता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, देवाडा खुर्द (ता. पोंभूर्णा)
- कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, जिल्हा चंद्रपूर
- उपाध्यक्ष, गोला गोलकर यादव समाज संघटना, जिल्हा चंद्रपूर
- उपाध्यक्ष, ग्रामीण मागासवर्गीय शिक्षण प्रसारक संस्था, चिरोली (ता. मुल)
- प्रसिद्धी प्रमुख, भारतीय जनता पार्टी, पोंभूर्णा तालुका
- प्रभारी, पतंजली योग समिती, पोंभूर्णा तालुका
- तालुका प्रतिनिधी, दैनिक तरुण भारत
- कोषाध्यक्ष, पोंभूर्णा तालुका पत्रकार संघ
- संचालक, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित, पोंभूर्णा
शैक्षणिक, सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल आयोजित हा कृतज्ञता सोहळा पोंभूर्णा तालुक्यातील एक प्रेरणादायी आणि संस्मरणीय कार्यक्रम ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.




0 टिप्पण्या
Thanks for reading