भाजप तालुका महिला अध्यक्षा सौ. वैशालीताई गोलमवार यांचा समाजोपयोगी उपक्रम
पोंभूर्णा | चंद्रपूर नगरी प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या तालुका महिला अध्यक्षा सौ. वैशालीताई गोलमवार यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. वाढदिवसाचे औचित्य साधून विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची सामूहिक शपथ घेत प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ. सुलभाताई पिपरी, सौ. सुप्रियाताई नारनवरे, सौ. वर्षा वारजूरकर, सौ. अर्चना मडावी, सौ. सीमा शिडाम, सौ. वीणा कुडमेते, माजी नगरसेवक मोहन चलाक, डॉ. एन. जी. नेताम, पुरुषोत्तम शिडाम, डॉ. अनिल नीलमवार, वसंतराव कोतपल्लीवार, ललिता कोतपल्लीवार, अनिलजी गोलमवार, वैभव वासेकर, वैभव गोलमवार, डॉ. गौरव नायताम यांच्यासह भाजपच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्ते, मातृशक्ती तसेच वार्ड क्रमांक ४ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी वृक्षारोपण ही काळाची गरज असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्यांचे जतन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिल्याबद्दल उपस्थितांनी सौ. वैशालीताई गोलमवार यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
: भाजप तालुका महिला अध्यक्षा सौ. वैशालीताई गोलमवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात नगराध्यक्षा, मान्यवर, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते व वार्ड क्रमांक ४ मधील नागरिक सहभागी झाले.





0 टिप्पण्या
Thanks for reading