मनोज भाऊ दुर्गे यांचे दुःखद निधन : संघर्षमय आयुष्याचा झाला अंत
✍️ विजय जाधव, प्रतिनिधी – दरारा 24 तास न्यूज नेटवर्क, मुल
मुल तालुक्यातील नांदगाव गावातील लघुउद्योजक मनोज भाऊ दुर्गे (वय अंदाजे 62) यांचे दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने नांदगावसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मनोज भाऊ दुर्गे हे अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवन जगलेले व्यक्तिमत्त्व होते. आयुष्यात अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी आपल्या मुलांना उत्तम शिक्षण दिले व शासकीय सेवेत प्रतिष्ठित पदांवर रुजवले. आपल्या मेहनतीच्या आणि प्रामाणिक स्वभावामुळे त्यांनी गावात एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
ऐन सुखाच्या काळात काळाने अचानक त्यांना हिरावून नेल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनामुळे समाजातील एक कर्तबगार, प्रामाणिक व सर्वांना मदत करणारा व्यक्ती हरपल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
मृत्यूसमयी त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात जाण्याने दुर्गे कुटुंबीयांसह नांदगाव ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरारा 24 तास न्यूज नेटवर्कतर्फे दुर्गे कुटुंबीयांप्रती सखोल संवेदना व्यक्त करण्यात येत असून, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना. 🙏
0 टिप्पण्या
Thanks for reading