Advertisement

🗳️ जि. प. व पं. स. निवडणुका : १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत जाहीर होणार



🗳️ जि. प. व पं. स. निवडणुका : १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत जाहीर होणार

गडचिरोली, दि. ३ ऑक्टोबर (प्रतिनिधी) – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला गती मिळाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे की, महाराष्ट्रातील ३२ जिल्हा परिषदा आणि त्यांअंतर्गत असलेल्या ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, संबंधित जिल्हाधिकारी १० ऑक्टोबर २०२५ रोजी स्थानिक वृत्तपत्रांत आरक्षण सोडतीसंदर्भातील अधिकृत सूचना प्रसिद्ध करतील. त्यानंतर, १३ ऑक्टोबर रोजी सोडत काढण्यात येऊन प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल.

या प्रारूप आरक्षणावर नागरिकांना आणि संबंधितांना १४ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत हरकती व सूचना दाखल करण्याची संधी दिली जाणार आहे. प्राप्त झालेल्या हरकतींचा सखोल विचार करून ३ नोव्हेंबर २०२५ रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव जॅफेथ मोरे (SECM) यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

📍 भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे – मनमोहन बंडावार
दरम्यान, पंचायत समिती चामोर्शीचे माजी उपसभापती मनमोहन बंडावार यांनी आगामी आरक्षण सोडत प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, “१३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आरक्षण सोडतीच्या दिवशी सर्व भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रक्रियेवर लक्ष ठेवावे. हे आगामी निवडणुकीसाठी संघटनात्मकदृष्ट्या महत्त्वाचे पाऊल ठरेल.”

👉 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीची ही आरक्षण सोडत प्रक्रिया महत्त्वाची ठरणार असून, त्यावर आगामी राजकीय समीकरणेही मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या