Advertisement

अवैध दारूसह 73 लाखांचा मुद्देमाल जप्त – स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई



अवैध दारूसह 73 लाखांचा मुद्देमाल जप्त – स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

✍️ सुखसागर झाडे
गडचिरोली, 2 ऑक्टोबर: जिल्ह्यात दारूबंदी असतानाही काही व्यक्ती अवैध देशी दारूची वाहतूक व विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर गडचिरोली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 73 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेला 1 ऑक्टोबर रोजी गुप्त माहिती मिळाली होती की अहेरी तालुक्यातील मौजा मद्दीगुडम येथे अवैध दारू वाहतुकीची मोठी हालचाल सुरू आहे. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ धाड टाकली असता, महिंद्रा स्कॉर्पिओ (क्र. MH 34 CD 8410) या चारचाकीत देशी दारूचे मोठे प्रमाणात बॉक्स विक्रीसाठी तयार करण्यात येत असल्याचे आढळले.

या कारवाईत पोलिसांनी मिथुन विश्वास मडावी (वय 35, रा. आलापल्ली, ता. अहेरी, जि. गडचिरोली) यास ताब्यात घेतले असून वाहनासह संपूर्ण दारू जप्त केली आहे. मात्र, आरोपीचे तीन साथीदार पोलिसांचे अस्तित्व लक्षात येताच घटनास्थळावरून फरार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.

जप्त मुद्देमालाचे तपशील:

  • देशी दारूचे एकूण 730 बॉक्स – अंदाजे किंमत ₹58,40,000
  • महिंद्रा स्कॉर्पिओ चारचाकी – अंदाजे किंमत ₹15,00,000
  • एकूण जप्त मुद्देमाल – ₹73,40,000

या प्रकरणी अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 306/2025 अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(अ), 65(ई), 83, 98(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपीला अटक करून पुढील कारवाई सुरू असून, फरार आरोपींचा शोध पोलिसांकडून युद्धपातळीवर घेतला जात आहे.

या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून, दारूबंदी कायद्याची अंमलबजावणी अधिक कठोरपणे करण्यासाठी पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्यात सखोल मोहीम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

🔎 पुढील तपास सपोनि. देवेंद्र पटले यांच्याकडून सुरू आहे.


📰 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क — स्थानिक गुन्हेगारी व पोलिस कारवाईवरील अद्ययावत आणि सविस्तर बातम्यांसाठी आमच्यासोबत रहा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या