💥 जिवंत गोरा चोरी करून कापून खाल्ल्याचा क्रूर प्रकार! – शेतकरी हादरला, पोलिस तपासात धक्कादायक उघड 💥
✍️ दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
📍 पोंभुर्णा / मुल (जि. चंद्रपूर)
मुल पोलीस ठाण्याच्या हद्दीत फुटाणा मोकासा येथे घडलेल्या गोठ्यातून गोरा चोरी प्रकरणाने थरारक वळण घेतले आहे. पोलिस तपासात समोर आले आहे की, चोरीस गेलेला गोरा केवळ चोरून नेण्यात आलेला नसून, जिवंत अवस्थेतच कापून त्याचे मांस शिजवून खाल्ले गेले आहे. या अमानुष प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे.
📍 घटना कशी घडली?
प्रकाश मुकुंदा कुडके (वय ५५ वर्षे, व्यवसाय शेती, रा. फुटाणा मोकासा, ता. पोंभुर्णा, जि. चंद्रपूर) हे आपल्या कुटुंबासह गावात राहतात आणि शेती करतात. त्यांच्या गोठ्यात एक गाय आणि तिचा गोरा होता. २० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री त्यांनी दोन्ही जनावरे गोठ्यात बांधून ठेवली होती. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी गाईचा गोरा गायब असल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतरही गोऱ्याचा ठावठिकाणा लागला नाही, म्हणून त्यांनी मुल पोलीस ठाण्यात तोंडी रिपोर्ट दाखल केला.
📍 पोलिस तपासात उघडले अमानुष सत्य
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. चोरी गेलेला गोरा चक्रपाणी वाकडे यांच्या घरी नेण्यात आला होता आणि तेथेच आरोपींनी त्या गोऱ्याला जिवंत अवस्थेतच कापून टाकले. याहूनही संतापजनक बाब म्हणजे, चक्रपाणी वाकडे यांनी स्वतः पोलिसांसमोर कबुली देत सांगितले की, “माझ्या घरी सुमारे ७० ते ८० किलो मटन कापण्यात आले, ते मटन मी स्वतः शिजवून खाल्ले.”
📍 घटनास्थळावरून मटण आणि अवयव जप्त
पोलिसांनी घटनास्थळावरून पूर्ण शिजवलेले मटण तसेच गोऱ्याचे सर्व अवयव जप्त केले आहेत. या क्रूर कृत्यामुळे शेतकरी प्रकाश कुडके यांच्या आयुष्यावर मोठा आर्थिक व मानसिक आघात झाला आहे. चोरीस गेलेला गोरा अंदाजे अडीच वर्षांचा, लाखा रंगाचा होता आणि त्याची किंमत सुमारे ₹३०,००० इतकी होती.
📍 मुख्य आरोपी फरार – पोलिस कारवाईवर प्रश्नचिन्ह
या प्रकरणातील मुख्य आरोपी चंद्रपूर येथील असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून सध्या तो फरार आहे. तथापि, पोलिसांनी घटनास्थळावरून सर्व पुरावे जप्त करूनही अद्याप ठोस कारवाई केलेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये पोलिस प्रशासनाविषयी तीव्र नाराजी आहे.
📍 शेतकऱ्याचा न्यायासाठी आक्रोश
या घटनेमुळे प्रकाश कुडके यांचे शेतीचे चाकच थांबले असून ते मानसिकदृष्ट्या कोलमडले आहेत. “माझ्या डोळ्यांसमोर आयुष्यभराच्या कष्टाचे जनावर निर्दयपणे कापून खाल्ले गेले. पोलिसांनी मला न्याय मिळवून द्यावा, नाहीतर मी न्यायासाठी रस्त्यावर उतरू,” असा टाहो त्यांनी फोडला आहे.
📌 मुख्य मुद्दे :
फुटाणा मोकासा येथे चोरी गेलेल्या गोऱ्याचा क्रूर अंत – जिवंतपणे कापून मटण शिजवले
चक्रपाणी वाकडे यांची कबुली : “७०-८० किलो मटण शिजवून खाल्ले”
घटनास्थळावरून शिजवलेले मटण व अवयव जप्त
मुख्य आरोपी चंद्रपूर येथील, सध्या फरार
पोलिस कारवाईवर नागरिकांमध्ये तीव्र संताप
शेतकऱ्याचा न्यायासाठी आक्रोश
🔥 हा प्रकार फक्त चोरी नाही, तर शेतीशी जोडलेल्या शेतकऱ्याच्या आयुष्यावर थेट आघात आहे. अशा घटनांवर कठोर कारवाई होऊन दोषींना शिक्षा झाली पाहिजे, अशी सर्व स्तरांतून मागणी होत आहे.




0 टिप्पण्या
Thanks for reading