👇 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
🚜 तात्काळ नवीन कृषी सहाय्यकाची नेमणूक करा – शेतकऱ्यांची मागणी!
पोंभुर्णा : ✍️ प्रतिनिधी
तालुक्यातील शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी मा. पानसरे साहेब यांच्याकडे तातडीने नवीन कृषी सहाय्यक नेमणुकीची मागणी केली आहे. सध्या कार्यरत असलेले कृषी सहाय्यक पेंदोर पुढील पंधरा दिवस रजेवर जाणार असल्याने त्यांच्या ऐवजी कायमस्वरूपी सहाय्यकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची एकमुखाने मागणी आहे.
मागील काही दिवसांपासून कृषी सहाय्यक पेंदोर यांच्या कार्यपद्धतीबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांची कामे वेळेवर न होणे, जाणूनबुजून विलंब करणे, टाळाटाळ करणे, उद्धटपणे वागणे आणि खोटी माहिती देणे अशा अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी संबंधित कार्यालयात नोंदवल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पेंदोर यांनी शेतकऱ्यांना अनावश्यक नियम सांगून कामात अडथळा निर्माण केला आहे. कधी कधी शेतकऱ्यांशी अपमानास्पद भाषेत बोलले जाते, तर कधी त्यांच्या अर्जांची जाणीवपूर्वक विलंबित दखल घेतली जाते. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
शेतकरी संघटनांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, “कृषी सहाय्यकांनी नियम शिकवण्यापेक्षा शेतकऱ्यांची कामे कमी कागदपत्रांमध्ये, कार्यालयाच्या दारात वारंवार हेलपाटे न मारता पूर्ण व्हावीत, यासाठी प्रयत्न करावेत.”
शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असा इशारा दिला आहे की, शेतकऱ्यांच्या विरोधात जाणारे निर्णय घेतल्यास कार्यालयात काम करणे कठीण होईल.
📍(दरारा 24 तास न्यूज नेटवर्क)
0 टिप्पण्या
Thanks for reading