Advertisement

*सुरजागड दौरा : डॉ. धर्मराव बाबा आत्राम व तनुश्री आत्राम यांनी ऐकल्या जनतेच्या समस्या*

 


*सुरजागड दौरा : डॉ. धर्मराव बाबा आत्राम व तनुश्री आत्राम यांनी ऐकल्या जनतेच्या समस्या*


✍️सुखसागर झाडे. 


      अहेरी : “लोकांसाठी, लोकांसोबत — हीच आहे अहेरीची आत्मा.” या ध्येयवाक्याला अनुसरून माजी मंत्री विधमान आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम व सिनेट सदस्या तनुश्री आत्राम यांनी सुरजागड येथे दौरा केला.

        या दौऱ्यात त्यांनी सुरजागड येथील घराघरांत जाऊन नागरीकांसोबत कुटुंबीयांशी संवाद साधला, संपूर्ण शाळांची पाहणी केली. रुग्णालयातील रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांबाबत तसेच औद्योगिक क्षेत्रातील कामगारांशी चर्चा केली. जनतेच्या समस्या जाणून घेताना त्यांनी त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.


     महिलांच्या कष्टाचे कौतुक करताना व मुलांच्या भविष्यासाठी संधी निर्माण करण्याचे आश्वासन देताना नागरिकांमध्ये नवा उत्साह व विश्वास पसरला.


 “प्रत्येक घरात आनंद, प्रत्येक हृदयात आशा” — हा संदेश त्यांनी जनतेपर्यंत पोहोचविला.


या दौऱ्यामुळे सुरजागड परिसरात सकारात्मकता व विकासाविषयी विश्वासाची भावना दृढ झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या