दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
भाजपा युवा मोर्चा पोंभुर्णा तालुक्याच्या उपाध्यक्षपदी समीरजी गौरकार यांची निवड –आम. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या शुभेच्छा
पोंभुर्णा : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा पोंभुर्णा तालुक्याच्या उपाध्यक्षपदी समीरजी गौरकार यांची नुकतीच निवड करण्यात आली असून या निवडीबद्दल महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री व विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पत्राद्वारे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी पाठविलेल्या अभिनंदन पत्रात सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे की, “भारतीय जनता पक्ष हा भारतमातेच्या सेवेसाठी कटीबद्ध, निष्ठावान आणि कर्मठ कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. त्या संघटनेचा समर्पित कार्यकर्ता म्हणून आपली नियुक्ती ही सर्वांसाठी गौरवास्पद ठरावी आणि पक्ष संघटनेप्रती आपले योगदान निश्चितच मोलाचे ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मुनगंटीवार पुढे म्हणतात की, “भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्यात तसेच महाराष्ट्राच्या विकासात ७२-बल्लारपूर विधानसभा नेहमीच अग्रगण्य राहिली आहे. ही उपलब्धी पक्षातील कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच साध्य झाली असून त्या श्रेयात समीजी गौरकार यांचे योगदानही महत्वाचे ठरेल,” असेही त्यांनी नमूद केले.
आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता संघटन मजबूत करण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी गौरकार यांना केले. तसेच आपल्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीचे योग्य पालन करून समाजसेवेचे आणि मातृभूमीचे ऋण फेडावे, असे आवाहन त्यांनी पत्रातून केले आहे.
शेवटी सुधीर मुनगंटीवार यांनी गौरकार यांना पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी यशाच्या शुभेच्छा दिल्या.
युवा नेतृत्व म्हणून समीरजी गौरकार यांची ही नियुक्ती तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करणारी ठरली असून त्यांच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
✍️ – दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
0 टिप्पण्या
Thanks for reading