*हळदी माल व कान्होली येथील ठेंगणे पुलामुळे वाहतूक ठप्प*
*नागरीक करीत आहेत जीवघेणा प्रवास*
चामोर्शी:-✍️सुखसागर एम. झाडे
चामोर्शी तालुक्यात काल पासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाल्याचे चित्र दिसून येते. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास पावसाने उसंती घेतल्याने नागरीक आपल्या दैनंदिन विविध कामानिमित्त घराबाहेर पडले. परंतु रात्रंदिवस पडलेल्या जोरदार पावसामुळे मौजा हळदी माल व कान्होली येथील नाल्यावरील जुन्या ठेंगण्या पुलावरून पुराचे पाणी डुथळी भरून वाहू लागते. पुलं हे खुपच जुने व निजीर्ण वरून छोटे मोठे खड्डे पडले असल्याने पुराचे पाणी वाहत असताना प्रवास धारकांना जिवाची पैज लावून प्रवास करावा लागतो. हळदी माल नाल्याचे पुलं हे मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होण्यासाठी कारणीभूत असल्याचे चित्र दिसून येते.लगतचं लागुन असलेली पश्चिमेस वाहणारी वैनगंगा नदी जेव्हा डुथळी भरून वाहते तेव्हा सुद्धा नाल्याला दाब येऊन पुलावरून पाणी वाहत असते.सदर बाबीमुळे चामोर्शी भेंडाळा ते आष्टी मार्गाची वाहतूक वारंवार बंद पडत असते. सदर नाल्यावर नवीन पुलाची नितांत आवश्यकता असून सुद्धा शासनाकडे अनेक स्तरावरून मागणी तसेच निवेदन संबंधित विभागाला देऊनही प्रशासन कानाडोळा करीत असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे. आज ची पुरपरस्थीतीत मदतीचा हात देण्यासाठी *हळदी माल चे पोलीस पाटील ईश्वर झाडे हे देवदूत ची कामगीरी बजावत असतात. प्रवासी वर्गाची दक्षता व सतर्कतेची जाणीव करून देत आहेत.* सदर बाबीमुळे लगतच्या खेड्यापाड्यातुन शिक्षण घेण्यासाठी तालुका स्तरावर येणाऱ्या विधार्थ्यांचे शैक्षणिक नूकसान होत आहे. त्यामुळे प्रशासनाने हळदी माल येथील नाल्याच्या नवीन पुलाचे काम करुन विधार्थी तसेच समस्त नागरीकांच्या समस्या कधी सोडवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading