Advertisement

लोकनृत्य व भूमिका अभिनय स्पर्धेत नांदगाव हायस्कूलचा बहारदार विजय

 लोकनृत्य व भूमिका अभिनय स्पर्धेत नांदगाव हायस्कूलचा बहारदार विजय


विजय जाधव 

मुल (प्रतिनिधी) │ दरारा 24 तास न्यूज नेटवर्क

मुल तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या लोकनृत्य व भूमिका अभिनय स्पर्धेत नांदगाव जिल्हा परिषद हायस्कूलने आपली उत्कृष्ट कामगिरी सादर करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कला-सांस्कृतिक क्षेत्रातील प्रगतीसाठी शासनातर्फे तालुकास्तरावर आयोजित करण्यात आली होती.


शाळेचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रत्येक घटकावर बारकाईने लक्ष ठेवले. त्याचबरोबर शिक्षक खोब्रागडे सर, नमस्कार सर आणि वनकर सर यांनी विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी तयार करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या या प्रयत्नांचेच फलित म्हणजे विद्यार्थ्यांनी लोकनृत्य आणि भूमिका अभिनय या दोन्ही विभागांमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत शाळेचा गौरव वाढविला.

शाळेचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करत सर्व शिक्षक आणि पालकांचे आभार मानले. यापूर्वीही नांदगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावरील विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय पारितोषिके मिळवली आहेत.

शासकीय शाळा असूनही नांदगाव जिल्हा परिषद हायस्कूलने शैक्षणिक तसेच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. याच कारणास्तव या शाळेला पी.एम. श्री ही गौरवशाली पदवी प्राप्त झाली आहे. शाळेतील अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून संस्थेचा लौकिक सातत्याने वाढवत आहेत.

- दरारा 24 तास न्यूज नेटवर्क

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या