नांदगाव जिल्हा परिषद हायस्कूलच्या अध्यक्षपदी राजू पवार यांची निवड
विजय जाधव -
मुल (तालुका प्रतिनिधी) – मुल तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात आपली खास ओळख निर्माण केलेल्या आणि जिल्ह्यात लौकिक प्राप्त पी. एम. श्री नांदगाव जिल्हा परिषद हायस्कूलच्या अध्यक्षपदी राजू पवार यांची पालक सभेतून बहुमताने निवड करण्यात आली आहे.
ही शाळा पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण देणारी आणि परिसरातील अनेक गावातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे प्रमुख केंद्र आहे. उत्कृष्ट निकाल, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि विद्यार्थी-केंद्रित कार्यपद्धतीमुळे शाळेने प्रत्येक वर्षी उच्च निकालांचा इतिहास कायम राखला आहे.
विशेष म्हणजे, शाळेच्या कोणत्याही कार्यक्रमात किंवा निवड प्रक्रियेत राजकारणाला स्थान दिले जात नाही. शाळा व्यवस्थापन समिती, पालक वर्ग आणि शिक्षकवर्ग परस्पर सहकार्याने विद्यार्थ्यांना शांत, अभ्यासपूर्ण आणि सुसंस्कृत वातावरणात ज्ञानदान करतात.
मुख्याध्यापक बंडूजी करपे यांच्या नियोजनाखाली दि. 23 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या पालक सभेत शाळा व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया पार पडली. यात राजू पवार यांची अध्यक्षपदी तर किशोर सुदरी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी, शिक्षकांनी, पालक वर्गाने तसेच विद्यार्थ्यांनी नव्याने निवड झालेल्या अध्यक्ष राजू पवार आणि उपाध्यक्ष किशोर सुदरी यांचे हार्दिक अभिनंदन केले असून त्यांच्या कार्यकाळात शाळा अधिक प्रगतीपथावर जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
📌 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
0 टिप्पण्या
Thanks for reading