Advertisement

पोंभुर्णा तालुक्यात खताचा काळाबाजार : शेतकऱ्यांची आर्थिक लूट, कृषी विभाग गप्प! कृषी केंद्र चालकांची मनमानी, कृषी अधिकाऱ्यांचा कानाडोळा – तात्काळ चौकशीची मागणी 👉 माजी शिवसेना तालुकाप्रमुख दत्तू भाऊ मोरे यांचा इशारा – “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उग्र आंदोलन छेडू”

पोंभुर्णा तालुक्यात खताचा काळाबाजार : शेतकऱ्यांची आर्थिक लूट, कृषी विभाग गप्प!


कृषी केंद्र चालकांची मनमानी, कृषी अधिकाऱ्यांचा कानाडोळा – तात्काळ चौकशीची मागणी
👉 माजी शिवसेना तालुकाप्रमुख दत्तू भाऊ मोरे यांचा इशारा – “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उग्र आंदोलन छेडू”

पोंभुर्णा (जि. चंद्रपूर) :
तालुक्यातील शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडलेले आहेत. एकीकडे पीक हंगामाचे आव्हान आणि दुसरीकडे खताच्या काळाबाजारामुळे शेतकऱ्यांची अक्षरशः लूट होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख दत्तू भाऊ मोरे यांनी केला आहे.

💸 खत उपलब्ध असूनही कृत्रिम तुटवडा

राज्यात आणि जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरवठा पुरेशा प्रमाणात असतानाही पोंभुर्णा तालुक्यात खताचा तुटवडा दाखवला जात आहे. कृषी केंद्र चालक “खत उपलब्ध नाही” असे सांगून शेतकऱ्यांना ब्लॅकमध्ये खत विकत आहेत. एक युरियाची बॅग सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा ₹100 ते ₹110 अधिक दराने विकली जात असल्याचे उघड झाले आहे.

🚜 शेतकऱ्यांवर मनमानीची सक्ती

युरिया खत घेण्यासाठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती करून फॉस्फेट किंवा इतर महागडे खत खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे.
“जर फॉस्फेट घेतलं नाही तर युरिया मिळणार नाही,” अशी उघड धमकी कृषी केंद्र चालकांकडून दिली जात असल्याने शेतकरी फारच संकटात सापडले आहेत.

🌾 शेतीप्रधान तालुक्यात लूट

धान, सोयाबीन, कपाशी, मिरची, तूर आणि भाजीपाल्यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणाऱ्या या तालुक्यात शेतकरी मोठ्या खर्चाने शेती करत आहेत. परंतु खताच्या कृत्रिम टंचाईमुळे आणि ब्लॅकमुळे त्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होत असून नफा शून्य होत आहे.

📢 दत्तू भाऊ मोरे यांची मागणी

“शेतकरी प्रामाणिकपणे मेहनत करतो, मरमर करून अन्नधान्य तयार करतो, आणि तोच शेतकरी आज खताच्या अभावामुळे आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे. शासनाने आणि कृषी विभागाने तात्काळ पुढाकार घेत तालुक्यातील सर्व कृषी केंद्रांची चौकशी करावी. दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा,” अशी मागणी मोरे यांनी केली.

⚠️ अन्यथा तीव्र आंदोलन

“जर हा काळाबाजार आणि शेतकऱ्यांची लूट तातडीने थांबवली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू,” असा इशारा देखील त्यांनी दिला.


शेतकऱ्यांचा प्रश्न हा केवळ खतपुरवठ्याचा नसून तो देशाच्या अन्नसुरक्षेशी थेट निगडित आहे.
शेतकरी जगला तरच देश जगेल – आणि म्हणूनच शासनाने तत्काळ लक्ष घालून या काळाबाजारावर अंकुश ठेवणे ही काळाची गरज आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या