मादगी समाज भवन व शासकीय वसतिगृह उभारण्यासाठी राजुरा तहसीलदारांना निवेदन
राजुरा:- मादगी समाज भवनासाठी उपरोक्त समाजाला जागा उपलब्ध करून दयावे मादगी समाज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही प्रगती व शिक्षणापासून वंचित आहे. राजुरा शहर व तालुक्यात शेकडोच्या संख्येने समाज राहत आहे. सर्वच समाजाचे समाज भवन मंदिर आहेत. मात्र मादगी, मोची व मादिगा हा समाज अशिक्षित व असंघटीत असल्यामुळे मुळ मानवी हक्कांपासून वंचित राहिला आहे. मादीगा समाज भवन तालुक्यात कुठेच नाही हे विशेष व मोची,मादिगा, मादगी,मादरू समाज महाराष्ट्र राज्य तालुका राजुराच्या वतीने राजुरा व मादगी समाज संविधान भवन व वस्तिगुह मादगी समाज जागे साठी मागील दहा-पंधरा वर्षापासुन नझुलच्या सर्वे न.१४९/२जागेवर अतिक्रमण केलेले आहे. राजुरा तालुक्यात समाजाची लोकसंख्या मोठी असताना सर्व शासकीय योजनांपासून मादगी समाज वंचित राहिलेला आहे. तरी आपणांस विनंती आहे की, एक संविधानीक वास्तु समाजभवन उभारण्यात यावे
मादगी समाजाला उपलब्ध व्हावे यासाठी महसुलची जागा उपलब्ध करून द्यावे
या करिता राजुरा तालुक्यातील तहसीलदार हरीश गाडे साहेबाना निवेदन देण्यात आले.
प्रसिद्धी प्रमुख रवि त्रिशुलवार तसेच निवेदन देताना मादगी समाज पदधिकारी राजुरा तालुका अध्यक्ष-राजु दामेलवार, राजुरा तालुका सचिव-राजेन्द्र कलवल नत्थूजी गोड़सेलवार -जिल्हा चंद्रपुर ,महासचिव ,चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष-रामचंद्र आसमपेली सर,कोषाध्यक्ष विनोद आईलवार,सह कोषाध्यक्ष दिलीप गोडलवार,रविंद्र सिंघमवार, नामदेव आसमपेल्ली, शंकर बताशंकर,उपस्थित होते
.
0 Comments