नांदगावला स्मशान भूमी व रोडचे बांधकाम केव्हा होणार ? ग्रामस्थांनी विचारला प्रश्न
(विजय जाधव)
मुल तालुक्यातील नांदगाव या बहुचर्चित आणि राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या नांदगाव या गावात अनेक समस्यांचे ग्रहण लागले असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना कमी लेखत असतात यातच यांच्या राजकीय युद्धात विकास कामे खुंटल्याचे चित्र दिसून येत असून सरपंच विकास कार्य घडवून आणण्याचे कितीही प्रयत्न केले तरी विरोधी बाकावरून त्यांचे हे कार्य हाणून पाडण्याचे प्रयत्न विरोधकांकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे ग्रामस्थांना दिसून येत आहे. अशा बिकट अवस्थेत ग्रामपंचायतचा कारभार चालविताना आणि प्रभारी ग्रामसेवकांना हात्ताशी धरून गावातील विकास कामे करताना अशातच गेल्या काही वर्षापासून या गावात स्मशानभूमी रोड तसेच स्मशानभूमीचे दुरुस्ती करण या कामासाठी जन सुविधा योजनेतून निधी मंजूर झाल्याची माहिती प्राप्त आहे. परंतु अजून पर्यंत नांदगाव वासियांना स्मशानभूमी आणि रोडचे काम दिसलेच नाही ही खरी वास्तविकता आहे. मग निधी आला असेल तर गेला कुठे? जर निधी आला नसेल मग विद्यमान ग्रामपंचायत पदाधिकारी संबंधित विभागाकडे सदर कामासाठी निधीची मागणी करून स्मशानभूमी आणि रोडचे काम का करत नाही असा प्रश्न नांदगांवकर यांना पडलेला आहे. जर निधी प्राप्त झाला असेल तर चौकशी करून स्मशानभूमी आणि रोडचे काम त्वरित करून ग्रामस्थांना अंत्यविधीची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे.
1 Comments
करणे गरजेचे आहे
ReplyDelete