जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी याआधी तिहेरी हत्याकांडाने हादरलेल्या मौशी गावात पुन्हा थरार
दरारा 24 तास (चंद्रपूर): जादूटोण्याच्या संशयातून तालुक्यातील मौशी येथील एका वृद्धाच्या झालेल्या हत्येप्रकरणी नागभीड पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा तीन आरोपींना अटक केली. आरोपींना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली.
आसाराम सदाशिव दोनाडकर (वय ८० वर्षे) असे मृताचे तर संतोष जयघोष मैंद (२६), श्रीकांत जयघोष मैंद (२४) आणि रूपेश राजेश्वर देशमुख (३२) अशी आरोपींची नावे आहेत. गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास आसाराम डोनाडकर आणि त्याचे कुटुंबीय पेरणीविषयी चर्चा करीत होते. अशातच तू जादूखोर आहेस, जादूटोणा करतोस, अशी आरडाओरड करीत दोनाडकर यांच्या घरावर काहीजण धावून आले. एकाएकी घरातून ओढत हाताबुक्क्यांनी मारहाण करीत घरातून रस्त्यावर आणले. आरोपींकडून मारहाण होत असताना आसाराम दोनाडकर हे डोक्याच्या भारावर रस्त्यावर पडले, यात डोक्याला गंभीर दुखापत झाली. तरीही आरोपींची मृत आसाराम दोनाडकर शिवीगाळ सुरूच होती.
आसाराम बेशुद्ध पडल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात येताच लगेच उपचारासाठी ब्रह्मपुरीला हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आसाराम यांचा मुलगा लालाजी याने घटनेची माहिती नागभीड पोलिस ठाण्यास दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि आणि तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. नागभीड पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३०२,३२३,४५२,५०४,५०६,३ सहकलम २ (१) (ख) महाराष्ट्र नरबळी अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading