*घोडाझरी तलावात शेगांव ता. वरोरा येथील ४ युवक बुडाले*

*घोडाझरी तलावात शेगांव ता. वरोरा येथील ४ युवक बुडाले*


अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी


नागभिड---- तालुक्यातील पर्यटन स्थळ असलेल्या घोडाझरी तलावाच्या काठावर सेल्फी काढण्याच्या नादात चार युवक पाण्यात बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असुन, प्राप्त माहितीनुसार चंद्रपुर जिल्हातील वरोरा तालुक्यातील शेगांव येथील रहिवासी आहेत, नागभिड पासुन अवघ्या आठ कि,मी अंतरावर अभयारण्य असलेल्या घोडाझरी तलाव पाहण्यासाठी आठ युवक आले होते . 


सेल्फी काढण्याच्या नादात एक जण घसरून पडला व पाठोपाठ तीन जण पडले . त्यात (1)मनिष श्रीरामे वय (26 ) (2) धिरज झाडें वय (27) (3) संकेत मोडक (25) (4) चेतन मांदाडे वय (17) हे पाण्यात पडले व बुडाल्याची माहिती पुढे आली, त्या बातमीची माहिती नागभीड पोलीसांना देण्यात आली, माहिती मिळताच पोलीस निरीक्षक योगेश घारे ,वैभव कोरवते,सह इतर पोलीस चंबू घटनास्थळी रवाना होऊन तलावात बोटीच्या साह्यायाने बुडालेल्या युवकांचा शोधकार्य /शोध मोहिम वृत लिहेपंर्यत सुरु होती,

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू