Ticker

6/recent/ticker-posts

*सर्प दंशाने चिधी(माल) रयतवाडी येथील मुलीचा मृत्यू.*



*सर्प दंशाने चिधी(माल) रयतवाडी येथील मुलीचा मृत्यू.*

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी

नागभिड तालुक्यातील आठवड्यातील दुसरी घटना



      नागभिड ----तालुक्यातील चिंधी (माल) येथील मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. 
      सविस्तर वृत्त, काल रात्री कु. अपसरा विलास सुतार, वय (११ वर्ष) ही आपली आजी व भावां सोबत घरात झोपेत असताना मन्यार हा विषारी साप चावल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली .
 पहाटेला 3:20 वाजताचे दरम्यान गाढ़ झोपेमध्ये असताना विषारी साप चावल्यानंतर तिला नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र तिथे पोहोचेपर्यंत अप्सराचा मृत्यू झालेला होता. 
मृतक ही कर्मवीर विद्यालय नागभीड येथे ५ व्या वर्गात शिकत होती. तिचे आई वडील हे उडिसा मध्ये व्यवसाय करायला गेलेले आहेत.
        या पूर्वी सुद्धा १२ जुलै ला नागभीड तालुक्यातील ओवाळा येथील अमित संतोष महाडोळे वय (१२) वर्षे याला सुद्धा सर्पदंश झाला होता त्याचा सुद्धा सर्पदंशाने मृत्यू झालेला होता.
    पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे सापांच्या बिळामध्ये पाणी साचल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील साप हे गावातील घरात, गोठ्यात सुकलेल्या जागेच्या शोधात येतात. त्यामुळे लोकांनी काळजी घ्यायला हवी. आणि कोणताही विषारी साप चावला तर आधी शासकीय रुग्णालय गाठून प्राथमिक उपचार करून सर्पदंश झालेल्या व्यक्तीच्या जीव वाचवता येऊ शकतो.

Post a Comment

0 Comments