नागभीड तालुका प्रतिनिधी
नागभीड---नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वासाळा (मेंढा )येथील दामोधर केशव गावतुरे वय ५३ वर्षे धंदा शेती असून त्याचांच मुलगा प्रफुल गावतुरे वय १७ वर्षे याने स्वतःचे वडिलांस काठीने वार करून ठार केल्याची घटना दिनांक १ जानेवारी 2024 रोजी घडली. मृतक दामोधर गावतुरे, मुलगा प्रफुल आणि पत्नी वंदना गावतुरे एकाच घरी राहत असताना पत्नी बाहेर गावी कामानिमित्य गेली असताना बाप आणि मुलगा घरी असताना बापाला दारूचे व्यसन असताना मुलाचे आणि बापाचे काय? भांडण झाले की काय? हे गुलादस्यतात असताना मुलाने काठीने मारून ठार केले, असल्याचे त्याने सरपंच यांना सांगितले. त्या नंतर सरपंच यांनी पोलीस पाटील यांना ही घटना नागभीड पोलीस स्टेशन ला कळविण्यात आली, पोलीस टाॅप घटना स्थळी दाखल होऊन पोलिसांनी मारेकरी मुलगा प्रफुल दामोदर गावतुरे यास ताब्यात घेतले. मृतक दामोधर यास ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे आणण्यात आले. पोलीस स्टेशन नागभीड येथे मर्ग दाखल करून पोलीस उप विभागीय अधिकारी दिनेश ठोसरे यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरु असून शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईक यांना सुपूर्द करण्यात आले असून पुढील तपास ठाणेदार योगेश घारे करीत आहे.
0 Comments