Ticker

6/recent/ticker-posts

लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी संविधानाची मूल्ये आत्मसात करा- प्रा.माधव गुरनुले




कोरपना / गडचांदूर 
जगात सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशात आव्हाने देखील तेवढीच मोठी आहेत स्वातंत्र्यानंतर सात दशकामध्ये भारताने विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केली. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत अग्रेसर होत आहे मात्र भारतीय लोकशाही पुढील अनेक आव्हाने आजही कायम आहेत. खाजगीकरण, लोकसंख्या ,गरिबी स्वच्छता,भ्रष्टाचार ,धर्म,प्रांत,भाषा आणि लिंगाधारीत भेदाभेद यामुळे भारतीय लोकशाही धोक्यात येत असून युवकांनी हे आव्हान पेलण्यासाठी संविधानांची मूल्ये आत्मसात केली पाहिजे असे प्रतिपादन खत्री महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख व ज्येष्ठ प्राध्यापक माधव गुरुनूले यांनी केले आहे.
शरदराव पवार महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग, पोलिटिकल सायन्स क्लब व माजी विद्यार्थी समितीच्या वतीने आयोजित *भारतीय लोकशाही पुढील आव्हाने* या विषयावरील सेमिनार व वक्तृत्व स्पर्धेत ते बोलत होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य संजय कुमार सिंह तर तज्ञ मार्गदर्शक म्हणून सरदार पटेल महाविद्यालयातील डॉ. निलेश चिमूरकर, ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. हेमचंद दुधगवळी, डॉ. सुनील बिडवाईक व कार्यक्रमाचे आयोजक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय गोरे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी तज्ञ मार्गदर्शक डॉ. निलेश चिमूरकर यांनी भारतीय नागरिकांनी लोकशाहीच्या जपवणुकीसाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची कास धरली पाहिजे असे सांगून युवकांनी जबाबदार नागरिक म्हणून लोकशाहीच्या बळकटीसाठी कार्य केले पाहिजे असे ते म्हणाले.आपल्या


अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह यांनी भारतीय लोकशाही अमूल्य आहे अनेक आव्हाने येथील आणि जातील मात्र लोकशाहीची मूल्ये टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचे असल्याचे ते म्हणाले.
यावेळी चर्चासत्राचे व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन डॉ. संजय गोरे यांनी आयोजनाची भूमिका विशद करून स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोकशाहीच्या मूल्यांना अधिक बळकट करून संविधान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचे प्रतिपादित केले. या सेमिनारच्या निमित्ताने भारतीय लोकशाही पुढील आव्हाने या विषयावर व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेले होते या स्पर्धेत 17 विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्यापैकी प्रथम क्रमांक आकाश अडबाले, द्वितीय क्रमांक कोमल वाडीकार आणि तृतीय क्रमांक दिशा जुनघरी यांनी पटकाविला. यावेळी सर्व विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.शरद बेलोरकर यांनी केले तर वक्तृत्व स्पर्धेचे संचालन सनम पाचभाई यांनी केले तर उपस्थितांचे आभार ग्रंथालय प्रमुख मंगेश करंबे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील डॉ.राजेश गायधनी डॉ. माया मसराम, डॉ. सत्येंद्र सिंह उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक करून शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले

Post a Comment

0 Comments