मुल तालुका प्रतिनिधी
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुल चामोर्शी मार्गावर भीषण अपघात घडला असून या अपघातात पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली.
ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार पती जागीच ठार झाला तर पत्नी गंभीर झाली आहे. हे पती-पत्नी देवदर्शनाच्या करिता जात होते. मात्र त्यांच्यावर रस्त्यातच काळाने झडप घातली आणि पतीचा जागीच मृत्यू झाला. गणपत आगळे असे मृतक पतीचे नाव असून सुरेखा आगळे असे जखमी असलेल्या पत्नीचे नाव आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक गणपत आगळे हे मुल येथिल तेली मोहल्ला रहिवासी आहेत. आज रविवारी वर्षाचा पहिला दिवस असल्याने दुचाकीने पत्नी सुरेखा सह दोघेही चामोर्शी मार्गाने महाकाली मंदिरात देवदर्शनाकरिता निघाले होते.सोबत घरचे पूजेचे साहित्य गंगेत विसर्जित करण्याकरिता घेतले होते. पूजेचे साहित्य विसर्जन करण्याकरिता बोर चांदली नदीवरील पुलावर दुचाकी उभी करून पूजेचे साहित्य विसर्जन करीत असतानाच भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅक्टरने पतीला चिरडले यात त्यांचा जागीच मृत्यू झाला ,तर पत्नी सुरेखा ही गंभीरजणी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
0 Comments