विजय जाधव मुल तालुका प्रतिनिधी
पोभूर्णा तालुक्यात अनेक गावात वाघाची दहशत असून ग्रामस्थ भयभयीत झाले आहेत. असे असताना रानटी डुकरांनीही उभ्या पिकांमध्ये हैदोस घातलेला आहे. वन विभागाला अर्ज, विनंती करूनही वन विभाग जंगलात ड्युटी असल्याचे कारणे दाखवून शेतकऱ्यांच्या अर्ज, विनंती व मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
रानटी डुकरांमुळे अनेक शेतकऱ्यांची नुकसान झाली असून मौजा नांदगाव येथे गेल्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या रानटी डुकराच्या हल्ल्यातून बचावलेल्या नीलकंठ मारुती नरसपुरे वय ६० वर्ष या शेतकऱ्याची उन्हाळी सोयाबीन पीक गेल्या दोन दिवसापासून नास धूस करीत असल्याने नीलकंठ नरसपुरे यांची प्रचंड आर्थिक नुकसान झालेली आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष शेतात जाऊन उन्हाळी सोयाबीन व तुरीच्या पिकाची प्रत्यक्ष पाहणे केली असता हे वास्तव समोर आले. याबाबतची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली असता त्यांनीही प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यापूर्वी पावसाळी सोयाबीन लागवड केली असता शेतात पाहणी करीत असताना नीलकंठ नरसपुरे आणि त्यांच्यासोबत पाहणी करीत असलेले शेताशेजारील शेतकरी धोंडू जी वाघमारे या दोघांनाही रानटी डुकराने जखमी केले. जखमी असलेल्या दोन्ही रुग्णांना उपचारार्थ बेंबाळ येथिल प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात भरती करण्यात आले. परंतु दिनांक 17 आठ 2022 ला दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने पोभूणा तालुक्यातील नवेगाव मोरे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता नेण्यात आले. परंतु तिथे सदर रुग्णांवर योग्य उपचाराची सुविधा नसल्याने पोभूणा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ पाठवण्यात आले. परंतु तिथेही मलमपट्टी करून चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रवानगीची प्रत पुढील उपचारासाठी त्यांना देण्यात आली.
या सर्व घडामोडीत वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती असूनही माहिती देऊ नये, वन विभागाचा कर्मचारी सदर रुग्णांची पाहणी करण्याकरिता चंद्रपूर येथे घेऊन जाण्याकरिता एकही अधिकारी व कर्मचारी येऊ शकला नाही . प्राप्त माहितीनुसार वनपरिक्षेत्र अधिकारी हे त्यावेळी तालुक्याच्या ठिकाणी हजर होते. त्याचप्रमाणे क्षेत्र सहाय्यक सुद्धा तिथेच हजर असताना ग्रामीण रुग्णालयात रानटी डुकराच्या हल्ल्यातील जखमी शेतकऱ्यांना भेटू शकले नाही. यावरून वनविभाग आणि या घोसरी बीटातील कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांबद्दल किती आपुलकी असेल हे ताजे उदाहरण डोळ्यासमोर दिसून येत आहे.रानटी डुकराच्या हल्ल्यातील या शेतकऱ्यांना वन विभागाकडून अद्यापही कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नसताना त्यात शेतकऱ्याच्या शेतातील उभे सोयाबीनचे पीक रानटी डुकरांनी नासधूस केल्याने सदर शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे.
किमान नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा वजा विनंती अर्ज सहाय्यक तसेच वनरक्षक यांच्याकडे केलेले आहे.
0 Comments