आपला विकास आणि गांव भकास!
शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव
बीज,खते,औषधी आणि माल विक्री यात शेतकरीची दैना होत आहे.शेतकऱ्यांची मुले सरकारी नोकरीत लागलीत कि,ते बापालाही सोडत नाहीत.तर इतरांची कशी कदर करणार?
याला कारण आहे.मी अनेकदा विस्तृत लिहीले आहे कि, शेतकरी वर्गात, ग्रामीण भागात बुद्धी, ज्ञान,निती ची अलर्जी आहे.कोणी माणूस डॉक्टर वकील इंजिनिअर प्रोफेसर बनला तर त्याचा सत्कार होत नाही.पण पोलिस , फौजदार, तहसीलदार,बीडीओ बनला तर सत्कार करतात.का?याला आता शेतकऱ्यांना लुटण्याचा सरकारी परवाना मिळाला आहे.डॉक्टर, वकिल इंजिनिअर प्रोफेसर ला तसा परवाना मिळत नाही.त्याला बुद्धी ज्ञान वापरून व्यवसाय करावा लागतो.
शिवाय गावात जो माणूस लुटमार करतो,दारू मटण खाऊ घालतो लोक त्याला नेता म्हणतात.सरपंच निवडून देतात.म्हणे जो लुटतो तोच खाऊ पिऊ घालतो.जो लुटत नाही,दारू दरफडा करीत नाही तो काय कामाचा?असा खुलासा देतात.
घर, जमीन,खळे साठी भाऊ भाऊ, शेजारी शेजारी वाद घालून पोलिस स्टेशनमध्ये येतात.एकमेकांच्या शेतीवर अतिक्रमण करतात.या वेळेस गीता,भागवत, रामायण, महाभारत सर्वच गुंडाळून ठेवतात.
ग्रामीण भागात बाबा,बुवा किर्तन प्रवचन मधून शॉर्टकट स्वर्गाचा मार्ग सांगतात.जसे मंदिरात पैसे देऊन चोर मार्गाने दर्शन मिळते.तू भाऊची जमीन सोडून दे.तू भाऊचे घर सोडून दे.कर्ज घेतलें तर परत कर.असे कोणीही सांगत नाही.तू शिक्षण घेऊन नोकरीला लागला तर शेती घर मधे हिस्सा घेऊ नकोस असे कोणीही सांगत नाहीत.जावई कडून मुलीची खावटी मागू नकोस,असे कोणीही सांगत नाही.
तुझा बैल मरो आणि मला चामडे मिळो.
आता तर शेतकऱ्यांना कोणी सावकार कर्ज देत नाही.दिले तर शेती खरेदी करून घेतो.शेतकरी सुद्धा कर्ज घेऊन लग्नात बॅंड लावतो.आता तर चक्क बॅकांचे कर्ज काढून लग्नात बॅंड लावतात.कसे फिटेल कर्ज?नाही फेडले तर कोण देईल कर्ज?
मला वाटते धार्मिक ग्रंथ,कथा, किर्तन, प्रवचन यातून नितीमत्ता शिकवत नाहीत.सांगतात फक्त स्वर्गात जाण्याचा शॉर्टकट मार्ग.एक लोटा जल ,सब समस्या का हल.म्हणून कर्मकांड करणे शिकतात.ज्यात बुद्धी ज्ञान निती ची गरज नसतेच.एकाने केले.दुसऱ्याने पाहिले.तिसऱ्याने केले.ना मला समजले,ना तुला समजले. तू केले तसे मी केले.याला म्हणतात कर्मकांड.आता कपाळावर भला मोठा टिळा,गळ्यात लांबलचक माळा,खुरटी खाजरी दाढी वाढवली कि, पुण्यवान झाल्याचा समज पसरलेला आहे.मला नाही वाटत,असा देखावा करून पुण्य मिळते.एखादे राजकीय पक्षाचे किंवा समाजाचे पद मिळू शकते.एखादे राशन दुकान किंवा रेती मातीचे डंपर चालू शकते.खूप काही पैसे उडवले तर सरपंच बनू शकतो.
आधी पाटील पदाचा खूप वट होता.आता तर सरपंच पदाचा भाव वधारला आहे.राजीव गांधींनी वित्त आयोगाकडून सरळ ग्रामपंचायत ला निधी देणे सुरू केले.तेंव्हापासून सरपंच आणि ग्रामसेवक ही पदे मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री च्या बरोबरीने महत्वाची झाली आहेत.इतका पैसा येतो कि,चोरायचा कसा, लपवायचा कुठे यातच डोकं चालवावे लागते.आपला विकास आणि गांव भकास.
... शिवराम पाटील९२७०९६३१२२महाराष्ट्र जागृत जनमंचजळगाव३१/५/२०२४
0 Comments