Advertisement

भीषण अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू, एक गंभीर जखमी




भीषण अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू, एक गंभीर जखमी

नांदगाव परिसरात शोककळा

नांदगाव :-
लखन गोरडवार, शुभम वाकुडकर आणि नाना वाकुडकर हे आपल्या वेल्डिंग व्यवसायाच्या मालकाकडे घरगुती कार्यक्रमासाठी जात असताना मार्कंडा परिसरात भीषण अपघात झाला.

या अपघातात लखन गोरडवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर शुभम वाकुडकर (रा. बोंडाळा बु.) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात नाना वाकुडकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी सरपंच रवी भाऊ मरपर्लिवार हे त्यांच्या सहकाऱ्यांसह उपस्थित होऊन सोपस्कार पार पाडत आहेत.

या दुर्दैवी घटनेने नांदगाव परिसरात शोककळा पसरली आहे. दोन्हीही तरुण अविवाहित व मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांच्या निधनाने परिसरातील प्रत्येक जण हळहळ व्यक्त करीत आहे.

त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. दरारा 24 तास न्यूज नेटवर्क तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या