दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
राष्ट्रीय मानवाधिकार पर्यावरण सुरक्षा व निवारण संघटनेत मोठी नियुक्ती
राहुल सोनटक्के यांची नागपूर प्रदेश सचिवपदी निवड
चंद्रपूर | प्रतिनिधी
राष्ट्रीय मानवाधिकार पर्यावरण सुरक्षा आणि निवारण संघटना (नोंदणीकृत) यांच्या वतीने संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा. बालूसिंह तसेच राष्ट्रीय सचिव मा. दत्ताभाऊ बावणे यांच्या आदेशानुसार श्री राहुल मुर्लिघर सोनटक्के यांची सचिव, नागपूर प्रदेश (महाराष्ट्र राज्य) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती दिनांक १ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहणार असून, या कालावधीत राहुल सोनटक्के यांना नागपूर प्रदेशातील संघटनात्मक कामकाज, मानवाधिकार संरक्षण, पर्यावरण सुरक्षेशी संबंधित प्रश्न तसेच तक्रार निवारणाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत.
राहुल सोनटक्के हे वडोली, जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून, सामाजिक कार्य, जनहित आणि संघटनात्मक कामाचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन ही निवड करण्यात आल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. समाजप्रती असलेली त्यांची निष्ठा, सक्रिय सहभाग आणि कार्यतत्परता यामुळे संघटनेला नागपूर प्रदेशात अधिक प्रभावीपणे काम करता येईल, असा विश्वास नेतृत्वाने व्यक्त केला आहे.
संघटनेचा उद्देश समाजहित, देशहित, राष्ट्रहित आणि पर्यावरण संरक्षण या मूल्यांवर आधारित असून, मानवाधिकारांचे उल्लंघन, पर्यावरणीय समस्या तसेच नागरिकांच्या तक्रारींवर प्रभावी निवारण करण्यासाठी संघटना कार्यरत आहे.
या नियुक्तीची प्रत माहितीस्तव केंद्रीय गृहमंत्री कार्यालय, वन व पर्यावरण मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय मुंबई तसेच संबंधित विभागांना पाठवण्यात आली आहे.
दरम्यान, राहुल सोनटक्के यांनी नियुक्तीबद्दल समाधान व्यक्त करत संघटनेने दिलेल्या जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन करून नागपूर प्रदेशात संघटनेचे कार्य अधिक गतिमान करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
सत्य, निर्भीड आणि जनहिताची बातमी





0 टिप्पण्या
Thanks for reading