Advertisement

गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!




गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

✍️ प्रतिनिधी – दरारा 24 तास न्यूज नेटवर्क

गडचिरोली :
वनसंपदा, जलसंपदा, जमीन, समृद्ध संस्कृती आणि शौर्य यांनी नटलेला गडचिरोली जिल्हा आज आपला वर्धापन दिन साजरा करत आहे. जिल्ह्याची ओळख म्हणजे निसर्गसंपन्न वातावरण, शौर्य परंपरा आणि आदिवासी संस्कृतीचे जतन होय.

या विशेष दिनानिमित्त गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मा. तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले की,

"वनराई, जल, जमीन, संस्कृती आणि शौर्य यांनी नटलेला आपला गडचिरोली जिल्हा हीच आपली खरी ओळख आणि अभिमान आहे. वर्धापन दिनाच्या या पावन प्रसंगी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, सामाजिक ऐक्य आणि जनतेच्या जीवनात आनंद नांदो, हीच प्रार्थना."

गडचिरोली जिल्ह्याच्या स्थापनेनंतर गेल्या काही दशकांत सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अनेक सकारात्मक बदल झाले असून, आज जिल्हा प्रगतीच्या वाटचालीत सक्षम पावले टाकत आहे.

जिल्ह्यातील तरुणाई, शेतकरी, कामगार, आदिवासी बांधव व सर्वसामान्य जनतेच्या योगदानामुळे गडचिरोलीचा विकासाचा प्रवास अधिक बळकट होत आहे.

गडचिरोली जिल्हा अमर राहो! या घोषणेसह जिल्हावासीयांनी वर्धापन दिन साजरा केला.


👉 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या