Advertisement

अनुसूचित जाति,जमाती आरक्षण वर्गिकरण विरोधात बसपाची रॅली! — महामहीम राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत दिले निवेदन… — तहसीलदार श्रिधर राजमाने यांनी स्विकारले निवेदन ..

अनुसूचित जाति,जमाती आरक्षण वर्गिकरण विरोधात बसपाची रॅली! — महामहीम राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत दिले निवेदन… — तहसीलदार श्रिधर राजमाने यांनी स्विकारले निवेदन ..

✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर
        7887325430

चिमूर :- सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशाच्या बेंचने अनुसूचित, जाति,जमाती यांच्या आरक्षणात उपवर्गीकरण करून क्रिमीलेयर लावणे संदर्भात 1 ऑगस्टला निरवाडा दिला.


        हा निर्वाडा भारतीय संविधानाच्या विरोधात असून असंवैधानिक आहे.हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा या मागणीसाठी बहुजन समाज पार्टी चिमूर तर्फे शहरात बाईक रॅली काढण्यात आली व त्यानंतर महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.

अनुसूचित जाति जमाती यांच्या आरक्षणात उपवर्गीय वर्गीकरण करून क्रिमीलेयरची अट लावण्या बाबतचे अधिकार त्या-त्या राज्य सरकारला देण्यात आल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय बेंचने दिला आहे.

      हा निरवाडा अनुसूचित जाति जमातीवर अन्यायकारक आहे.यामुळे अनुसूचित जाति जमातीला क्रिमीलेयर न लावणे बाबत संसदेत घटना दुरुस्ती करून न्यायालयाचा निर्णय रद्द करावा.न्यायाधीशाच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम बंद करून न्यायाधीशाची नियुक्ती ऑल इंडिया जुडेशरी सर्व्हिस चे गठन करून यात आरक्षण लागू करावे,”एसी,एसटी,ओबीसी भटक्यांचे आरक्षणाला कायदेशीर करण्यासाठी संविधानाच्या शेड्युल नऊ मध्ये अंतर्भाव करावा.खाजगी संस्था मध्ये आरक्षण लागू करावे.जाति जमाती,ओबीसी यांच्ये रिक्त असलेले पदाची भरती करावी,खुल्या प्रवर्गातील जागांच्या स्थितीचे स्वेतपत्र जाहीर करावे या मागण्याचे निवेदन देशाचे महामहिम राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदनं देण्यात आले.सदर निवेदन चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने यांनी स्विकारले.

      निवेदन देतांना बसपाचे जिल्हासचिव सुभाष पेटकर,रामराव ननावरे, विधानसभा अध्यक्ष महेंद्र बारसागडे,सचिन लाभणे,कवडू निकेश्वर,निळकंठ जांभुळे,दिगांबर गणवीर,उमदेव गजभे,सुरेश मेश्राम,स्कायलॅब मेश्राम,निकेतन गेडाम,वंचीतचे शुभम मंडपे,विश्वास जनबंधू,सखाराम पाटील यांच्या सह शेकडो नागरिक उपस्थित होते.
बाईक रॅली ने वेधले लक्ष!
     बहुजन समाज पार्टी चिमूर द्वारे,”अनुसूचित जाति,जमाती यांच्या आरक्षण संदर्भात,”सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आरक्षण उप वर्गीकरण व क्रिमीलेयर च्या विरोधात,बसपाचे जिल्हासचिव सुभाष पेटकर यांच्या नेतृत्वात संविधान चौक,नेहरूंचौक,बाजारपेठ,डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक मार्गे तहसील कार्यालयापर्यत विविध नारे देत बाईक रॅली काढून नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले…

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या