✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर
7887325430
चिमूर:- दि.१९ इतर मागास बहुजन कल्याण विभाग सहाय्यक संचालक इतर मागास बहु जन कल्याण, चंद्रपूर चे वतीने १५ ऑगस्ट २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध शासकीय योजनांचा प्रचार व प्रचारासाठी तालुकास्तरीय मेळावा आयोजन करण्यात येत आहे. या निमित्याने आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा येथे विविध शासकीय योजना बद्दल विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. नीलकंठ शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, भद्रावती येथे मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाला अध्यक्ष, उपप्राचार्य धोटे मॅडम नीलकंठ शिंदे महाविद्यालय भद्रावती, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. डहेगावकर, प्राचार्य डी. डी. दोहतरे कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालय गौराळा, भद्रावती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी मुख्याध्यापक पी. एफ, पवार यांनी केले. मार्गदर्शन कार्यक्रमा च्या सुरुवातीला कलापथक जनजागृती कार्यक्रम व माहिती रथ नेचर फाउंडेशन, नागपूर चे कलावंताच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले. यावेळी कलावंत सुनील कापटे गायक सुनील नन्नावरे, वादक सूरज राजनहिरे, पथकप्रमुख - विलास चौधरी व रथाचे सारथी राहुल झाडे यांनी सहभाग घेतला.
0 टिप्पण्या
Thanks for reading