✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर
7887325430
चिमूर:- दि.१९ : शासनाची योजना
जनसामान्यांपर्यंत पोहोचावी व त्याचा लाभ सर्वांना घेता यावा या उद्देशाने महावितरण कर्मचाऱ्यांनी बाईक रॅलीतून बॅनर आणि पॅम्पलेट घेउन नवा उपक्रम राबविला. संजय जळगावकर उपकार्यकारी अभियंता, उपविभाग चि मूर यांच्या मार्गदर्शनाखाली कृपाल लंजे कनिष्ठ अभियंता विज वितरण केंद्र भीसी व भीसी वीज वितरण केंद्रातील संपूर्ण कर्मचारी यांनी बाईक रॅलीतून प्रधानमंत्री सुर्य घर योजने चा प्रचार केला व लोकांना योजने चे ठळक मुद्दे पटवून दिले. ही योजना महावितरण च्या घरगुती ग्राहकांसाठी आहे तसेच सौर ऊर्जा पॅनलद्वारे केलेली वीजनिर्मिती ही घरगुती वापरापेक्षा
जास्त झाल्यास ग्राहकांना विज बील शून्य येणार आहे व जास्त निर्मीत झालेली ऊर्जा महावितरण ला विकून उत्पन्न मिळवण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. आणि या योजने अंतर्गत एक कीलोवॉट सौर पॅनल वर ३०००० रुपये, दोन कीलोवॉट सौर पॅनल वर ६०००० रुपये व तीन कीलोवॉट व त्यापेक्षा जास्त सौर पॅनल वर ७८००० रुपये चे अनुदान शासनाकडून मिळणार असल्याचे त्यां- नी सांगितले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेबसाईट वर भेट देऊन नोंदणी करता येईल. या योजनेत सहभागी होऊन हरित ऊर्जा निर्माते बनून पर्यावरण संरक्षक होण्याचे आवाहन त्यांनी या बाईक रॅली च्या माध्यमातून समस्त जनतेला केले.
0 टिप्पण्या
Thanks for reading