विरोधी पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती
_______________________
✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर
7887325430
----------------------------------
भिसी दि.१७: नागरीकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, व त्यांचे समस्यांचे निराकरणासाठी तसेच काँग्रेसचे संघटन मजबुतीसाठी भिसी शहरात काँग्रेस कमिटी कार्यालयाचे उद्घाटन नवनिर्वाचित खासदार डॉ. नामदेवरावजी किरसान आणि चिमूर विधानसभा समन्वय सतिशभाऊ
वारजूकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजय भाऊ वडेट्टीवार प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी माजी आमदार अविनाशभाऊ वारजूकर, ओबीसी नेते धनराज भाऊ मुंगले, काँग्रेस जिल्हा महासचिव सचिन भाऊ गाडिवार, काँग्रेस तालुकाध्यक्ष गावंडे, भिसी काँग्रेस शहराध्यक्ष विजय मेहर, महिला काँग्रेस शहराध्यक्ष माधुरी रेवतकर, युवा काँग्रेस शहराध्यक्ष शुभम गिरडे तसेच काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भिसी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Thanks for reading