✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर
7887325430
चिमूर :- तालुक्यातील
उमरी येथील प्रादेशिक पाणीपुरवठा नळ योजनेतून परिसरात पाणी पुरवठा केला जातो. मात्र या योजनेचे पाणी मागील ३ दिवसांपासून गढूळ येत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गेल्या ३-४ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू होती, त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. पाणी स्वच्छ राहावे म्हणून ब्लिचिंग पावडरचा वापरही होत नाही. अशात सामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. स्वतः डॉ. सतीश वारजुकर यांनी हातपंपाचे
पाणी पिले असता ते पिण्या व वापरण्या योग्य नाही शुद्ध व पिण्यायोग्य पाणी लवकरात लवकर मिळावे, अशी मागणी गावकऱ्यांनी राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र डॉ. वारजुकर यांना करताच तत्काळ गावकऱ्यांसाठी टँकरने पाणी पाठवले गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष विनोद ढाकूनकर, तालुका उपाध्यक्ष राजू चौधरी, नगर परिषद चिमूर माजी उपाध्यक्ष तुषार शिंदे, माजी नगरसेवक नितीन कटारे, मीडिया प्रमुख पप्पू शेख, मुरलीधर गायकवाड व गावकरी उपस्थित
होते.
0 Comments