शेतकऱ्यांना जखमी करणाऱ्या वाघाचा बदोबस्त तात्काळ करा - साईश वारजूकर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रस सरचिटणीस

शेतकऱ्यांना जखमी करणाऱ्या वाघाचा बदोबस्त तात्काळ करा - साईश वारजूकर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रस सरचिटणीस


✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर
          7887325430

चिमूर : - दिनांक.०५/०८/२०२४ चिमूर तालुक्यात दिवसागणिक मानव व वन्यजीव संघर्ष वाढत चालला असून एकाच दिवशी तालुक्यातील विविध भागात पट्टेदार वाघाने ४ शेतकऱ्यांवर हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना दिनांक.०४/०८/२०२४ ला घडली यामध्ये गरडापार , किटाळी , उरकुडपार , नवेगाव पेठ येथील सर्व गंभीररित्या शेतकरी जखमी झाले असून या गावामध्ये नागरीकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.


त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रसचे महासचिव साईश सतिश वारजूकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कार्यालय चिमूर येथे जखमी करणाऱ्या वाघाचे तत्काळ बदोबस्त करण्यात यावे याबाबतचे निवेदन देऊन गरडापार गावात जावून गस्तीवर असेलेले वनपरिक्षेत्र अधिकारी देऊरकर व नागरीक यांच्याशी सवांद साधला यावेळी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष रोशन ढोक , तालुका सरचिटणीस विलास मोहिनकर , युवक कॉग्रेसचे विधान सभा उपाध्यक्ष प्रशांत डवले , युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव रोहन नन्नावरे , अक्षय लांजेवार , अक्षय नागरीकर , राहुल पिसे , अमित मेश्राम , सौरव जस्वाल व आदी काँग्रेस पदाअधिकारी उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू