चिमूर: बैलांना बंधाऱ्याच्या पाण्यातून वाचविण्यासाठी दोघेही बापले गेले, परंतु दुर्दैवाने बंधाऱ्यात दोघेही वाहून गेले. मात्र वडिलांना झाडाचा आधार मिळाला आणि त्यांनी झाडावर चढून आपला जीव वाचविला परंतु बापाच्या डोळ्यादेखत मुलगा वाहून गेल्याने बापाच्या जिवंत असलेल्या हृदयात मृत्यूच दिसत होता.
तालुक्यातील खडसंगी जवळ मजरा बेगडे गावातील रहिवासी वामन राणे, वय (४६) व मुलगा समीर राणे वय (२०) हे दोघे सकाळी शेताकडे गेले असता सायंकाळीं ४:३० वाजताच्या सुमारास बैलजोडी घेउन घराकडे येत असताना बंधाऱ्यावर बैल जात असल्याने दोन्ही बैलाचे दोर एकमेकाला गुंतले होते.त्यामुळें बंधाऱ्यावर गेलेल्या बैलाचे दोर सोडवण्यासाठी बापलेक बंधाऱ्यावर गेले. एक बैल बंधाऱ्यात शीरलेला होता व दुसरा बैल बाहेर होता. एकमेकाला बांधून असणारा दोर सोडवत असताना दुसऱ्या बैलाने ओढल्याणे दोघेही बापलेक बंधाऱ्या वरून खाली पडून वाहत गेले.
वामन राणे हे झाडाला अडकले व ते झाडावर चढले. त्यामुळें त्यांचा जिव वाचला. मुलगा समीर मात्र बंधाऱ्यात वाहून गेला. घटनेची माहिती चिमूर पोलीस स्टेशनला देण्यात आली. चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळीं उशिरापर्यंत मुलगा समीर याचा शोध घेतला मात्र समीर चा मृतदेह वृत प्रकाशित करे पर्यंत मिळाला नव्हता.
0 Comments