मोटेगाव येथील विद्यार्थ्याला उच्च शिक्षणासाठी आमदार बंटी भांगडिया यांचेकडून शैक्षणिक मदत

मोटेगाव येथील विद्यार्थ्याला उच्च शिक्षणासाठी आमदार बंटी भांगडिया यांचेकडून शैक्षणिक मदत


✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर
          7887325430
चिमुर- तालुक्यातील मोटेगाव येथील शंकर पुरुषोत्तम पर्वते या विद्यार्थ्याला बी. फार्म द्वितीय वर्ष शिक्षणासाठी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे कडून आर्थिक मदत करण्यात येऊन पुढील शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक मदत करण्यात आली.
या विद्यार्थ्याने आतापर्यंतच्या शैक्षणिक कालखंडात अप्रतिम कामगिरी करीत प्राविण्य प्राप्त केले होते परंतु पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक चणचण निर्माण झाल्याने पालकांनी त्याचा शिक्षण थांबविण्याचा विचार केला असता, त्याच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी ही गंभीर बाब या क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ यांना सांगितली. सदर विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये व शिक्षण घेऊन तो स्वतःच्या पायावर उभा राहावे व कुटूंबाचे नाव उज्जवल करावे यासाठी आमदार साहेबानी तात्काळ शैक्षणिक मदत जाहीर करीत अर्थिक मदत, कार्यकर्त्यांच्या हस्ते त्याच्या वडिलांचे सुपुर्द करण्यात आली. यावेळी महामंत्री विलास कोराम, श. के. प्र. विक्की कोरेकर, बु.अ. गणेश मेहरकुरे, बु.अ. यशवंत भानारकर, बु.अ. प्रदीप सुकारे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू