Ticker

6/recent/ticker-posts

*आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा*

*आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा*


✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर

दि. ९ ऑगस्ट/ *आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया* यांनी आज शेतकरी भवन चिमूर येथे आदिवासी विकास विभाग - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर द्वारा आयोजित जागतिक आदिवासी दिन कार्यक्रम व गौरव सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. दरम्यान, आदिवासी विकास विभागाच्या वतीने *आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया* यांचा शाल व रोपटं भेट देऊन स्वागत-सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी *आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया* यांनी सर्वप्रथम सर्व थोर महात्म्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले आणि उपस्थितांशी विविध विषयांवर संवाद साधून जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, *आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया* यांच्या हस्ते प्रकल्प कार्यालय एन. बी. योजनेअंतर्गत योजनांचे लाभार्थ्यांना धनादेश वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, तालुक्यातील नव्याने शासकीय सेवेत नोकरीवर लागलेल्या यशवंत आदिवासी युवक/युवतींना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोपटे प्रदान करीत त्यांचा सन्मान करण्यात आला.

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी विभागाच्या वतीने पारंपारीक आदिवासी नृत्य व हस्तकला प्रदर्शनी, प्रकल्प कार्यालय एन. बी. योजने अंतर्गत योजनांचे लाभार्थ्यांना धनादेश वाटप, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, प्रकल्पांतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, शेतीतील उत्पादनाच्या वेगळ्या वाटा मार्गदर्शन, आदिवासी विकास विभागांर्गत विविध योजनांची जनजागृती, प्रकल्पांर्गत तालुक्यातील नव्याने शासकीय सेवेत नोकरीवर लागलेल्या यशवंत आदिवासी युवक/युवतींचा सन्मान, सिकलसेल विषयक जागरूकता व मार्गदर्शन व मोफत सिकलसेल तपासणी शिबीर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी मार्गदर्शन, माविमं बचत गटाद्वारे बनविलेल्या वस्तुंची प्रदर्शनी अशा विविध कार्यक्रम तथा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमूर प्रविण लाटकर सर, बाल विकास प्रकल्प अधिकारी चिमूर पूनम गेडाम मॅडम, आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी डॉ. महेश मंगर, आदिवासी सेवक - पेंदोर सर, भाऊराव दांडेकर, कन्नाके सर तसेच, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजपा युवा नेते समीर राचलवार, सं.गां.नि.अ.यो. समिती अध्यक्ष संजय नवघडे, भाजपा ज्येष्ठ नेते घनश्याम डुकरे, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्रीरंग (बालू) पिसे, भाजपा अनुसूचित जमाती आघाडी तालुकाध्यक्ष गजानन गुडधे, भाजयुमो तालूका सचिव तथा सरपंच ग्रा. पं. म्हसली संकेत सोनवाने, भाजयुमो शहराध्यक्ष बंटी वनकर, भाजयुमो शहर महामंत्री अमित जुमडे, भाजयुमो शहर महामंत्री श्रेयश लाखे व अन्य मान्यवर, आदिवासी विकास विभागाचे अधिकारी/कर्मचारी आणि आदिवासी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments