Ticker

6/recent/ticker-posts

वाघाच्या हल्ल्यात केळझर येथील गुराखी ठार


विजय जाधव
मूल : तालुक्यातील केळझर येथे वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याची घटना काल दिनांक 9 आगस्ट रोजी दुपारी घडली. गणपत लक्ष्मण मराठे वय वर्ष 60 राहणार केळझर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराखी चे नाव आहे.

केळझर येथील जंगलात कंपार्टमेंट नंबर 431 या परिसरात गणपत मराठे नेहमीप्रमाणे गाई म्हशी चरायला नेला होता. दबा धरून बसलेल्या वाघाने गुराखीवर हल्ला करून ठार केले. ही घटना काल दुपारी घडली. मात्र गुराखी घरी परत आला नसल्याने घरच्यांनी व गावकऱ्यांनी वनविभागाला माहिती देऊन आज सकाळी शोधाशोध केली. शोध करीत असताना गणपत मराठे यांचा मृतदेह आढळला.

चिचपल्ली वनपरीक्षेत्रातील वनरक्षक वाघमारे आणि वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित झाले होते. वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी आता गावकरी करू लागले आहे.

Post a Comment

0 Comments