Ticker

6/recent/ticker-posts

*पोंभूर्णा तालुक्यातील चेक बल्लारपुर व उमरी पोतदर येथे शिवसेनेची बैठक संपन्न*

*पोंभूर्णा तालुक्यातील चेक बल्लारपुर व उमरी पोतदर येथे शिवसेनेची बैठक संपन्न*


▪️जनतेच्या समस्यांसाठी मी तत्पर - जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे

▪️भगवा सप्ताह व जनजागृती अभियानाची झाली तालुक्यातून सुरुवात 

पोंभूर्णा :- तालुक्यातील चेक बलारपुर व उमरी पोतदार येथे काल दि. ८ ऑगस्ट ला सायंकाळी शिवसेना (उध्दव  बाळासाहेब ठाकरे) वतीने भगवा सप्ताह, जनजागृती अभियान,निमित्त बैठक घेण्यात आली.या बैठकीला शिवसेना चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत दादा कदम,जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे, व पोंभूर्णा शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार यांची प्रमुख उपस्थित होती.

यावेळी पक्षाच्या  आढावा बैठकीत जनतेच्या समस्या व शासनाच्या योजनांची फसवेगिरी,महायुतीचे सरकार कसे शेतकरी विरोधी आहे हे पटवून दिले.शेतकऱ्यांचे प्रश्न,पिक विमा,अतिवृष्टी,याबाबत शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी या साठी लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजनाची तयारी सुरू आहे.जनतेच्या समस्यासाठी मी सदैव तत्पर राहील असे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी आपल्या मार्गदर्शनात बोलत होते. भगवा सप्ताह निमित्त झालेल्या बैठकीत उमरी पोतदार व चेक बल्लारपूर गावातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी युवासेना शहर प्रमुख महेश श्रिगिरीवार,उप तालुका प्रमुख रवींद्र ठेंगणे, मुकेश ढुमणे, लोकाजी दामनपल्लीवार,सुनील ढुमणे, नितीन येरोजवार,रुपेश ढोमणे,रजित ढवणे,बाळू भगत, निखिल इष्टाम,भगवान ठेंगणे, दामोदर वैद्य,चंद्रशेखर ढुमणे,पत्रू फरकडे, तर उमरी पोतदार येथील गोकुळ तोडासे,स्वप्नील लेनगुरे,अमित कुमरे,अर्जुन येमप्रेडीवार,महेंद्र देवाहिरकर,गणेश पेंदोर,महेश कुडमेथे,नितेश कुमरे,हर्षल सिडाम,शुभम सिडाम,विक्की शेंडे व आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments