Ticker

6/recent/ticker-posts

देवाडा बुज. ते पिंपरी देशपांडे पोचमार्गाची दुर्दशा- अनेकदा निवेदन देऊनही समस्या कायम ! ताबडतोब रस्त्याची मंजुरी करून काम करावे-भाजपाचे दिनेश बदन यांची मागणी

देवाडा बुज. ते पिंपरी देशपांडे पोचमार्गाची दुर्दशा-


अनेकदा निवेदन देऊनही समस्या कायम !

ताबडतोब रस्त्याची मंजुरी करून काम करावे-भाजपाचे दिनेश बदन यांची मागणी 

पोंभर्णा: तालुक्यातील देवाळा बुद्रुक ते पिपरी देशपांडे हा पोचमार्ग वर्षानुवर्षापासून रखडलेला आहे. दोन वर्षांपूर्वी एमआरईजीएस द्वारे या रस्त्याचे माती काम करण्यात आले असल्याची माहिती आहे परंतु हा रस्ता खडीकरण मुरमीकरण न झाल्यामुळे  या मार्गावरील शेतकऱ्यांना व आवागमन करणाऱ्याना, नागरिकांना प्रचंड चिखलातून चिखल तुडवत यावे- जावे लागते. 

या विभागाचे आमदार तथा पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना सुद्धा या संबंधाने निवेदन दिले आहेत. तसेच स्वर्गीय खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना सुद्धा निवेदना द्वारे या रस्त्यासाठी मागणी केलेली असताना आज तागायत या रस्त्यावर कुठलेही काम झाले नाही. त्यामुळे या रस्त्यावर पावसाळा भर चिखलाचे साम्राज्य असते. निवडणूक आली तर आस्वानांचा भडीमार केल्या जातो परंतु निवडणूक संपली की जो तो आपल्या बिळात लपून बसतो अशीच अवस्था ग्रामीण भागातील रस्त्यांच्या बाबतीत व इतर विकास कामांच्या बाबतीत झालेली पाहायला मिळते.

दिनेश बदन,भाजपा कार्यकर्ते

अत्यंत महत्त्वाचा हा रस्ता असल्यामुळे प्रशासनाने व शासनाने त्वरित या रस्त्याला "रस्ता"! म्हणून नाव द्यावा अन्यथा "चिखल पायवाट" हेच नाव अजरामर राहील. असे मत वजा मागणी भाजपचे देवाडा बुज.येथील कार्यकर्ते दिनेश बदन यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments