गोवर्धन येथे अवैध दारू विक्रीला उधाण!
अवैध दारू विक्री बंद करण्याची गावकऱ्यांची मागणी🙏
ग्रामपंचायत सदस्य व पोलीस पाटील असक्षम असल्याचा आरोप
चंद्रपूर: मुल तालुक्यातील बेंबाळ पोलीस चौकीच्या हद्दीतील गोवर्धन येथे अवैध दारू विक्री सुरू असल्याने या अवैध दारू विक्रीमुळे गावातील संसार उध्वस्त होत आहेत. भावी पिढीवर याचा गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने गोवर्धन येथील अवैध दारू विक्रीवर आळा बसवून उचित कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व बेंबाळ पोलीस दुरक्षेत्राच्या अंतर्गत गोवर्धन येथे अनेक वर्षापासून अवैध दारूचा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. या अवैध दारू विक्रेत्याला गावातील ग्रामपंचायत सदस्य व पोलीस पाटील सहकार्य करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. अवैध दारू विक्रेत्याला सहकार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा बडतर्फ करण्यात यावे व त्यांच्यावरही उचित कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दोन किलोमीटरवर नांदगाव येथे परवानाधारक देशी चे दारू दुकान आहे. परंतु सरकारी परवानाधारक दुकान असतानाही ठिकठिकाणी दारूचे अड्डे निर्माण झाले आहेत, याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading