पोंभुर्ण्यात उद्या भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी होणार
पोंभुर्णा:धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची १४७ वी जयंती पोभुर्णा येथील किरण राईस मिलच्या भव्य पटांगणात साजरी होणार आहे.
या आदिवासी जयंती कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे जिल्हा अध्यक्ष प्रमोदजी बोरीकर हे असणार असून मुल येथील सामाजिक कार्यकर्ते प्रियदर्शन मडावी सर, सामाजिक कार्यकर्ते संपत कनाके, आदिवासी विकास परिषदेचे युवक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष कृष्णा मसराम, सामाजिक कार्यकर्ते प्रदिप गेडाम, सेवानिवृत्त वनपरिक्षेत्राधिकारी मुरलीधरजी टेकाम, सामाजिक कार्यकर्ते इंद्रजासजी कडते, सामाजिक कार्यकर्ते किशोर पेंदाम, सामाजिक कार्यकर्ते चंदुभिऊ जुमनाके, सामाजिक कार्यकर्ते अशोक येरमे सर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
महापुरुषांच्या या जयंती कार्यक्रमात आदिवासी समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन नवेगाव मोरेचे सरपंच जगदीश सलामे, जूनगावचे माजी सरपंच जीवनदास गेडाम, मुरलीधर सिडाम यांनी केले आहे.
कार्यक्रमात येणाऱ्या सर्व आदिवासी बांधवांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
0 Comments