Ticker

6/recent/ticker-posts

वसंत येलमुले यांचे दुःखद निधन। कुटुंबावर शोक कळा

वसंत येलमुले यांचे दुःखद निधन। कुटुंबावर शोक कळा



पोंभुर्णा प्रतिनिधी
तालुक्यातील जुनगाव येथील अल्पभूधारक शेतकरी वसंत केशव एलमुले वय 66 वर्ष यांचे आज दुपारी दीड वाजताचे सुमारास दुःखद निधन झाले.

वसंत येलमुले हे आपल्या मुलीच्या गावी म्हणजेच चामोर्शी तालुक्यातील सगनापूर येथे गेले होते तिथेच त्यांना लकवा मारल्याच्या कारणावरून भेंडाळा येथे दाखल करण्यात आले होते. तिथल्या डॉक्टरांनी त्यांना गडचिरोलीला रेफर दिला. गडचिरोलीतील डॉक्टरांनी चंद्रपूर च्या दवाखान्यात पाठविले. तिथे त्यांचा उपचार सुरू असतानाच आज सोमवारी दुपारी दीड ते दोनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. 
त्यांच्या मृत्यूची वार्ता गावात पसरतात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता वैनगंगा नदीच्या तीरावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. 
त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन विवाहित मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे. 
घरातील कमावता व्यक्ती गेल्याने कुटुंबावर आघात झालेला आहे.

Post a Comment

0 Comments