गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील राका गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेच्या शौचालयात एक जिवंत अर्भक आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत हा प्रकार कोणी केला आहे याबाबत अद्यापही कोणताही पुरावा हाती लागला नसल्याची माहिती आहे.
शाळेतील शौचालयात रात्रीच्या वेळेस अज्ञात व्यक्तीने तर भाग टाकून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान याबाबत अधिक माहिती अद्याप स्पष्ट झाली नाही. विशेष म्हणजे या शाळेला काही बाजूने भिंतीचे मोठे कंपाउंड असून गेट बंद असतानाही येथे अर्भक टाकण्यात आले. प्राथमिक शाळा परिसरात प्रसूती झाल्याची माहिती समोर येत आहे. शाळेत अर्भक आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या अर्भकाला सडक अर्जुनी येथील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत.
0 Comments