चंद्रपूर-◼️किरण घाटे◼️
विदर्भात अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती येथील (सार्वजनिक बांधकाम विभाग)उपविभाग जिवतीचे २७ वर्षिय तरुणतुर्क, कनिष्ठ अभियंता अनिल जगन्नाथ शिंदे यांना दि.१ नोव्हेंबरला दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसबीच्या पथकाने रंगेहात पकडल्यामुळे जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.
या घटने बाबत हाती आलेल्या माहितीनुसार असे कळते कि, तक्रारदार यांनी केन्द्र सरकारच्या योजना अंतर्गत अतिदुर्गम जिवती तालुक्यातील पुल बांधणीचे काम केले.सदरहु बांधकाम केलेल्या चार बिलांपैकी दोन बिले पाठवल्या बद्दल व दोन बिले मंजुरीकरीता पाठविण्याच्या कामासाठी तब्बल दोन लाख रुपयांची मागणी अभियंता शिंदे यांनी केली .ती लाच स्विकारल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने त्या लाचखोर कनिष्ठ अभियंतावर गुन्हा दाखल केला आहे.
लाच देणे व घेणे हा कायद्याने गुन्हा आहे, याची या तरुणतुर्क अभियंत्यास पूर्णपणे जाणीव असतांना देखिल (या घटनेतील) त्या लाचखोरास लाच मागणीचा मोह टाळता आला नाही. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या धडाकेबाज कारवाईचे जनतेंनी उत्स्फुर्तंपणे स्वागत केले आहे .
⚪◼️उपरोक्त कारवाई पोलीस अधीक्षक विशाल वाघ, (ला.प्र.वि. नागपूर )मधुकर गिते(अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर )यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई पथकातील अविनाश भामरे, (पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. चंद्रपूर) पोलिस निरीक्षक शिल्पा भरडे , एएसआय रमेश दुपारे, नापोशी नरेश कुमार नन्नावरे, पोलिस शिपाई रोशन चांदेकर , रवि ढेंगळे ,वैभव गाडगे , अमोल शिडाम , राकेश जांभुळकर ,पुष्पा काचोळे , मेघा मोहुर्लै व रमेश हाके यांनी यशस्वीपणे पार पाडली .
0 Comments