एकीकडे निवडणुकीचा प्रचार मात्र अज्ञात इसमांचे बॅनर फाडण्याकडे लक्ष
एका गावात नागरिकांनी चक्क बॅनरच फाडले
गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे.
https://youtu.be/aaC5sg-pxG4
मात्र प्रचारासाठी लावण्यात आलेला बॅनरवर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धारदार ब्लेडने मारून बॅनर फाडण्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या भडंगा येथील वार्ड क्रमांक एक मध्ये उघडकीस आली आहे.
ग्राम विकास परिवर्तन पॅनल चे बॅनर वार्ड क्रमांक एक येथिल तेली टोल्यावरील मध्यंतरी चौकात बॅनर लागले असून रात्री च्या वेळी काही अज्ञात नागरिकांनी ब्लेड मारून बैनरला फाडण्यात आले.
कोणत्याही नागरिकांनी बॅनर फाडणाऱ्या इसमाना बघितले नाहि. असे आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी सांगितले...
भडंगा येथील वार्ड क्रमांक एक मधिल हनुमान मंदिराजवळच्या चौकात ग्राम विकास परिवर्तन पॅनलचे उमेदवारांचे अंदाजे आठ बाये बाराचे बॅनर चा बोर्ड चौकात लागला होता प्रितीलाल तुरकर, बबलू सोनवांणे, राकेश बघेले यांचा घराजवळील चौका मध्ये बॅनर लागला होता ....
ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे निवडणुक लढणारे सरपंच पदाचे उमिदवार सुरेश कुमार नानाजी दमाहे , वार्ड क्रमांक एक येथिल सदस्या करीता लढणारे सदस्य यशवंत नामदेव मोटघरे, कूंदाबाई योगेश शहारे यांनी कारवाही करण्याची मागणी केली आहे....
https://youtu.be/aaC5sg-pxG4
एकीकडे आचारसंहिता सुरू असून गावातील काही अज्ञात इसमांनी रात्रीची वेळ बघून आठ बाय बाराच्या बॅनर वर धार धार शत्राने ब्लेड मारले .
याकरिता ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
https://youtu.be/aaC5sg-pxG4
0 Comments