बागलकोट:-संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडा सारखीच एक घटना कर्नाटकातील बागलकोट येथे उघडकीस आली आहे. पोटच्या मुलानेच जन्मदात्या बापाला ठार करून मृतदेहाचे 32 तुकडे केले आहेत. हे सर्व तुकडे त्याने एका बोरवेल मध्ये टाकले होते.
पोलिसांनी आरोपी विठ्ठल कुणाल याला ताब्यात घेतले आहे. परशुराम कुलाल असे ठार झालेल्या दुर्दैवी बापाचे नाव आहे.
वडील दारूच्या नशेत नेहमीच शिवीगाळ आणि मारहाण करायचे, ते सहन न झाल्याने त्यांची हत्या करण्यात आली अशी कबुली आरोपी विठ्ठल कुणाल यांनी दिली आहे.
0 Comments